yoga vidyadham pcmc

Yoga Vidya Dham PCMC

Yoga Vidya Dham PCMC

PCMC Center

चिंचवड शाखेचा इतिहास

“ नमस्ते आदिनाथाय विश्वनाथाय ते नमः |

योग मार्गे कृते स्तुभ्यम महायोगीश्वराय ते। ”

योग्य इतका प्राचीन आहे की तो प्रथम आदिनाथ शंकरांनी सांगितला असे म्हणतात. ‘ पातंजल योग दर्शन ‘- भारतीय मानसशास्त्र भारतीयांनी जीवन कसं जगावं ? हे सांगणार शास्त्र हा आपला दैदिप्यमान ठेवा प्राचीन काळी ऋषि मुनींनी जपला.

तो आधुनिक काळात जनसामान्यांपर्यंत पोहोचावावा, त्यांचे जीवन सुखी व समृद्ध व्हावे या विचाराने प्रेरित होऊन काही मंडळी एकत्र आली व त्यांनी १९६० मध्ये पुण्यामध्ये ‘भारतीय योग विद्याधाम’ संस्थेची स्थापना केली. त्यानंतर गुरुवर्य डॉ. विश्वासराव मंडलिक यांनी १९८३ साली नाशिकमध्ये योग विद्यापीठाची स्थापना करून प्रचार व प्रसाराचे कार्य सुरू केले. गुरुवरयांच्या या कार्यात कै. श्री. श्रीकांत जोगळेकर सर आपला खारीचा वाटा उचलू लागले. योग विद्याधाम पिंपरी चिंचवड शाखेचे स्थापना १९८५ साली झाली. जेव्हा श्री जोगळेकर सर १९८८ मध्ये पिंपरी चिंचवड शाखेमध्ये आले तो दिवस या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्याजोगा आहे. सरांचा पुतण्या श्री नितीन जोगळेकर यांच्या सहकार्याने बजाज कंपनीमध्ये योग वर्ग सुरू झाले. सरांची कन्या सौ. सुजाता परांजपे आणि जावई श्री श्रीकृष्ण परांजपे हे योग वर्ग घेत असत. १९८८ पासून खऱ्या अर्थाने ‘ योग विद्याधाम ‘ पिंपरी – चिंचवड शाखेचा योग वृक्ष सर्वांगाने फुलू लागला बहरू लागला. आणि आज त्याचा विशाल महाकाय असा वटवृक्ष झाला आहे. याच्या छायेखाली कितीतरी जणांचे जीवन सुखी व समृद्ध होत आहे. या वृक्षाला रूजविण्यात आणि वाढविण्यात अनेक हातांची मेहनत आहे. तो काळ अतिशय खडतर व कष्टाचा होता. पण ते आव्हान या हातांनी लिलया पेलले.

ती १९९० साली स्थापन झालेली कार्यकारिणी

  1. श्री मोहन कृष्णाजी कुलकर्णी
  2. सौ चित्राताई रवींद्र सोनईकर
  3. श्री कृष्ण परांजपे
  4. सौ रंजना भोंडवे
  5. श्री वामन सोपान आल्हाट
  6. श्री ब्रह्मानंद जगन्नाथ घुगरे
  7. श्री श्रीकांत जोगळेकर
  8. श्री माधव वामन तराटे
  9. श्री गोपाल नारायण नेवे

श्री जोगळेकर सरांची कार्यपद्धती अतिशय शिस्तबद्ध काटेकोर वक्तशीर तरीही आपुलकीची व आत्मीयतेची होती. त्यामुळे संघटना वाढीस लागली राहत्या ठिकाणापासून दूर दूर जाऊन त्या काळच्या शिक्षकांनी वर्ग घेतले. यामध्ये अग्रगण्य होते श्री श्रीराम संत पुजारी, सौ छाया ताई मठकर, सौ नीला कृपस्थ, श्री अनिल् थत्त्ते, सौ सोनई कर ताई, कै. श्री. गोपाळ नवे आणि इतर. त्यामुळेच कार्य फक्त पिंपरी व चिंचवड पुरतेच मर्यादित न राहता त्याचा विस्तार तळेगाव देहू पासून सांगवी औंध पर्यंत व आता त्याही पुढे होत आहे.

प्रारंभी योग प्रवेश वर्गापासून येथील कार्याची सुरुवात झाली. परिचय, शिक्षक नाशिकला जाऊन करावे लागे. परंतु 1999 पासून परिचय, प्रबोध, शिक्षक, अध्यापक असे प्रगचेही अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सोय झाली. याची सविस्तर माहिती पुढे पाहणारच आहोत.

योगाभ्यास आणि आरोग्य यांचा संबंध जनसामान्यांना येऊ लागल्यावर योगोपचार व निसर्ग उपचार करण्यासाठी एका केंद्राची आवश्यकता वाटू लागली. प्रथम कै. श्री. गोपाळ नेवे यांच्या घरी व नंतर श्री प्रमोद निफाडकर यांच्या निवासस्थानी केंद्र सुरू झाले. त्यानंतर २००६ मध्ये ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ’ द्वारे योगशिक्षक पदविका अभ्यासक्रमास मान्यता मिळाली. तसेच २००९ मध्ये निसर्गोपचार, २०११ मध्ये मसाज चिकित्सा (ITI) हे अभ्यासक्रम टेक्निकल बोर्ड मुंबई द्वारे घेतले जातात. दिल्लीच्या मोरारजीभाई देसाई राष्ट्रीय योग संस्थान द्वारे ‘स्वामी विवेकानंद’ जिल्हा योग केंद्राची स्थापना २०११ मध्ये झाली. शिवाय योग विद्याधामच्या अभ्यासक्रमांना महाराष्ट्राची मान्यता नुकतीच मिळाली आहे.

तसेच संस्था पुणे विद्यापीठांतर्गत योग संशोधन केंद्र म्हणून काम पाहते. या संस्थेने तळेगाव, देहू उरळीकांचन येथेही शाखा उघडण्यास सहकार्य केले आहे.

श्री प्रमोद निफाडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची घोडदौड चालू आहे. नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त संस्थेचे इतरही अनेक उपक्रम चालू असतात. योगाचे मोफत वर्ग, शिबिरे, शुद्धीक्रियांची शिबिरे, लहान मुलांसाठी योगानंद शिबिरे, जाहीर व्याख्याने, जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रम, गुरुपौर्णिमा, योग शिक्षक मेळावा, योगासन स्पर्धा, योग गीत स्पर्धा, वेगवेगळ्या कार्यशाळा ( उदा. गर्भसंस्कार, S.S.S. तेजस्वी युवा, आरोग्यदायी पाककला वगैरे ) सूर्यनमस्कार प्रकल्प, वारकरी मसाजसेवा, यौगिक सहली, कविकुलगुरू कालिदास विद्यापीठाच्या परीक्षांना विद्यार्थी बसतात त्यांना मार्गदर्शन, QCI (क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया ) च्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

असे अनेक उपक्रम मोठ्या हिरिरीने राबविले जातात. सध्याची कार्यकारिणी अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ कार्यकर्ते तसेच अगदी नुकताच शिक्षक होउन आलेला विद्यार्थी हा देखील मोठ्या उत्साहाने काम करतात.

अशाप्रकारे योग विद्याधामची घोडदौड गुरुवर्य डॉ. विश्वास मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

संस्थेकडे सौ. पौर्णिमाताई मंडलिक यांची करडी पण प्रेमळ नजर आहेच. शाखाध्यक्ष श्री गुरुराज चरंतीमठ यांचे सहकार्य नेहमीच लाभते.

Dr. Jyoti Salgarkar.

Yog Vidya Dham Pimpri Chinchwad has been conducting yoga classes, courses since more than 25 years.

Yoga classes, courses have been conducted in various parts of Pimpri Chinchwad area and also in various companies, colleges, academies, schools etc.

Yoga teachers of Yog Vidyadham P.C. have been working efficiently in all fields.

They are invited as yoga expert speaker and also to give Yoga training to students, working employees etc.

They are giving excellent Yoga training all over so they are also appreciated and felicitated by various colleges, companies schools etc.

Yoga Vidya Dham teachers are at their best. They have reached at international level and achieved medals in international Yoga competitions.