yoga vidyadham pcmc

Yoga Vidya Dham PCMC

Yoga Vidya Dham PCMC

Certification Course in Yoga Level 1

योग विद्याधाम पिंपरी चिंचवड या संस्थेद्वारा साधकाच्या व्यक्तिगत प्रगतीसाठी योगप्रवेश, योगपरिचय, योगप्रबोध, योगप्रवीण इत्यादी वर्गांचे अभ्यासक्रम राबविले जातात या सर्व अभ्यासक्रमांमध्ये ‘सोप्याकडून अवघडाकडे’ हा मूलमंत्र मानून योगप्रवेश वर्ग त्यानंतर योग परिचय पुढे योगप्रबोध त्यानंतर योगप्रवीण असा हळूहळू प्रगतीच्या दिशेने जाणारे अभ्यासक्रम योग विद्या गुरुकुल नाशिक यांच्या अंतर्गत योग्य विद्याधाम पिंपरी चिंचवड द्वारा हे व्यक्तीच्या शारीरिक मानसिक विकासाकरिता योगाचा प्रचार प्रसार करण्याकरिता राबविले जातात.

योगप्रवेश अभ्यासक्रम

योग्य प्रवेश हा अभ्यासक्रम हा प्राथमिक स्वरूपात पण सर्व उपयुक्त अशा आसनांचा समावेश असणारा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमामध्ये आसनाच्या बरोबर प्राणायम पूर्व तयारीसाठी श्वसनाचा अभ्यास शिकवला जातो. काही महत्त्वपूर्ण आवश्यक अशा तात्त्विक अभ्यासाचाही समावेश आहे.

  • पात्रता – १२ वर्षे पूर्ण हवे
  • कालावधी – पाच आठवडे हा वर्ग चालतो
  • उपासना – दर रविवारी घेतली जाते.
  • योग प्रवेशाचा वर्ग आजपर्यंत एकूण विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे.

कालावधी पाच आठवडे (रोज एक तास)

विपरीत शयन स्थितीतील आसने

शयन स्थितीतील आसने

बैठक स्थितीतील आसने

दंडस्थितीतील आसन

प्राणायामाची पूर्वतयारी

उपासना

तात्त्विक अभ्यास