yoga vidyadham pcmc

Yoga Vidya Dham PCMC

Yoga Vidya Dham PCMC

Yoga Anand Shivir for Children

सौ तृप्ती कोळेकर राणावत

“योग आनंद शिबीर” हा अतिशय स्तुत्य आणि आजकालच्या उमलत्या पिढीसाठी असलेला कार्यक्रम.

उन्हाळ्याची सुट्टी लागली की कंटाळा येतो, मुले त्रास देतात. या सर्व त्रासांवर उपयुक्त असलेला योग आनंद शिबीर हा कार्यक्रम.

कु. तृप्ती कोळेकर अतिशय उत्स्फूर्तपणे हा शिबिराचा कार्यक्रम राबवते. यामध्ये तिला तिचे वडील श्री किरण कोळेकर यांची मोलाची मदत होते.

संस्थेचे पदाधिकारी श्रीयुत जगताप सर, श्रीयुत निफाडकर सर यांचेही मार्गदर्शन सातत्याने असते. सौ ऐश्वर्या ताई जोशी व संस्थेचे इतर कार्यकर्ते देखील विविध विषयांवर मार्गदर्शन करतात.

विविध अंगांना स्पर्श करीत, कधी खेळातून कधी रंगातून तर कधी वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून त्यांना घडविण्याचे कार्य उत्तमरित्या या शिबिराच्या माध्यमातून केले जाते.

तृप्ती कोळेकरच्या या शिबिराला सर्वसाधारणपणे ५०-६० मुले प्रत्येक वर्षी असतात. यामध्ये डान्स, कराटे, एरोबिक्स, रांगोळी, मेहंदी इत्यादी अनेकविध गोष्टींचा समावेश असतो.