Diploma in Yoga Education – Yoga Prabodh
योग प्रबोध वर्ग
‘योगपरिचय’ हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ‘योगप्रबोध’ हा त्याच्या पुढचा प्रगतचा टप्पा आहे. त्यामुळे योग प्रबोध अभ्यासक्रमापूर्वी ‘योग्यपरिचय’ अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य आहे.
योगप्रबोध वर्ग हा रोज दीड तास असा सलग साडेतीन महिने घेतला जातो.
योग प्रबोध वर्गातील अभ्यासक्रम
- आसने
योग प्रवेश, परिचय यांमधील महत्त्वपूर्ण आसनांची उजळणी घेतली जाते. सर्वांगासन, शिर्षासन इत्यादी त्याचबरोबर प्रगतीची नवीन आसने शिकवून पुरेसा सराव घेतला जातो. करणहस्तभुजंगासन, अर्ध धनुरासन, अधोमुख श्वानासन, सर्वांगासनाचे प्रकार, बद्धपद्मासन, योगमुद्रा, वज्रमत्स्यासन, वज्रअर्धमत्स्येदासन, वज्रअर्ध भुजंगासन, बद्धहस्त गोमुखासन, पूर्णमत्स्येन्द्रासन ,मयुरासन, द्विपाद शिरासन, वातायनासन, पतंगासन, वीरभद्रासन, भुनमनासन, वीरभद्रासन, शीर्षासनाचे प्रकार, वसिष्ठासन, अर्धपद्मबंधासन, काश्यपासन इत्यादी आसने आहेत.
- मुद्रा
महाबंध, महावेध, महामुद्रा, षन्मुखी मुद्रा, खेचरी, भ्रुमध्यदृष्टी.
- शुद्धिक्रिया
जलनेती, वमन, दंडनेती, दंडधौती, नौली, बिंदू त्राटक
- प्राणायम
नाडीशुद्धी प्राणायाम, उज्जायी प्राणायाम, भ्रामरी प्राणायम.
- तात्विक अभ्यास
१) यमनियम
२) योगासने
३) शुद्धिक्रिया
४) ग्रंथपरिचय
- प्रबंध लेखन
आजपर्यंत एकूण साधकांनी योग प्रबोध हा वर्ग यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे.