Certification Course in Yoga Level 2
योग परिचय अभ्यासक्रम
योग प्रवेश या प्राथमिक वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्या पुढील योग्य परिचय हा प्रगत वर्ग आहे. या वर्गामध्ये प्रवेश घेण्याकरिता प्रथम योग्य प्रवेश वर्ग यशस्वीरित्या पूर्ण करून पुढे योग्य परिचय वर्गाच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो.
या वर्गामध्ये सर्व प्रगत अभ्यासक्रम आहेत.
शीर्षासन, परिवर्त त्रिकोणासन, उग्रासन, गरुडासन, हंसासन, गोमुखासन, अर्धपद्मबंधासन, उष्ट्रासन, मार्जरासन, उग्रासन, कर्णपीडनासन इत्यादी ४० नवीन आसनांचा समावेश आहे.
योग परिचय वर्गातील अभ्यासक्रमात प्राणायामाचे शास्त्रशुद्ध शिक्षण अंतर्भूत आहे.
१) नाडीशुद्धी प्राणायाम
२) उज्जायी प्राणायाम
३) भ्रामरी प्राणायाम
हे तीनही महत्त्वपूर्ण प्राणायम कुंभकयुक्त शिकवले जातात व योगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ते करून घेतले जातात. शास्त्रशुद्ध पद्धतीने या वर्गात शिकवला जातो.
- शुद्धिक्रिया
योगपरिचयच्या अभ्यासक्रमात चार शुद्धी क्रियांचा अंतर्भाव केला आहे केला गेला आहे.
जलनेती, वमनधौती, अग्निसार व कपालभाती
धारणेचा अभ्यासही अंतर्भूत आहे
जालंधर बंध, , मूलबंध, उड्डियान बंध
- तात्विक अभ्यासक्रम
यामध्ये एकूण चौदा व्याख्याने अंतर्भूत केलेली आहेत.
यम -नियम, आहार-विहार, आयुर्वेदीय दृष्टिकोनातून शरीराचे कार्य, स्नायूसंस्था, अस्थीसंस्था, श्वसन संस्था, अभिसरण संस्था, पचनसंस्था, उत्सर्जनसंस्था, मज्जासंस्था अंतस्त्रावी ग्रंथी इत्यादी व्याख्यानांचे आयोजन केले जाते. हा योग परिचय वर्ग ‘ योग प्रवेश ‘ हा प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरचा हा प्रगतीचा अभ्यासक्रम आहे. याचा कालावधी अडीच महिन्यांचा आहे.
आजपर्यंत एकूण विद्यार्थ्यांनी योग परिचय हा वर्ग योग विद्याधाम पिंपरी चिंचवड शाखेतून पूर्ण केलेला आहे.